Breaking News

युवा नेतृत्व अमोल गर्जे मित्र मंडळाच्या वतीने कोरोना योद्धांना चेहरा सुरक्षा कव्हरचे वाटप !


युवा नेतृत्व अमोल गर्जे मित्र मंडळाच्या वतीने कोरोना योद्धांना चेहरा सुरक्षा कव्हरचे वाटप

पाथर्डी/प्रतिनिधी :
माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाथर्डी तालुक्यातील कोरोना योध्ये यांना फेस शिल्ड ( चेहरा सुरक्षा कव्हर )चे  वितरित करण्यात आले. सध्या जग भरासह देशात कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे.त्याच दरम्यान सर्व नगरीकांची काळजी घेण्यासाठी पालिका, पोलीस,महसूल,आरोग्य आणि सर्व पत्रकार बांधव काम करत आहे. या अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल टाकत सर्वांना श्रीराम मित्र मंडळ, गोल्डन ग्रुप,लोकनेते गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठाण यांच्या वतीने फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले. 

   यावेळी जुन्या भाजप निष्ठावंत गटातील युवानेते अमोल गर्जे ,मुकुंद गर्जे यांच्या पुढाकाराने व  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी,पालिकेचे मुख्याधिकारी धंनजय कोळेकर यांच्या उपस्थिती फेस शिल्ड वितरण कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आले.आरोग्य,महसूल विभागा तसेच पत्रकार बांधवांकडे हे फेस शिल्ड सुपूर्द करण्यात आले.  

      यावेळी बोलतांना अमोल गर्जे म्हणाले,माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रेरणेने सामाजिक व  राजकीय वाटचाल चालू आहे.त्यांचे सामाजिक कार्यासाठी नियमित मार्गदर्शन लाभते.वाढदिवसाच्या दिवशी कोणतेही जाहिरात बाजी न करता सध्या कोरोनाच्या काळात शक्य असेल तेवढी कोरोना योद्धयांची मदत करा असा आदेश पंकजाताई साहेबांचा होता.त्यांनी सांगितल्या प्रमाणे ह्या फेस शिल्डचे सर्वत्र वाटप करत आहोत असे गर्जे म्हणाले.