Breaking News

नेवासा तालूक्यात कोरोनाला हद्दपार करण्याकडे प्रशासनाची आगेकुच.

नेवासा तालूक्यात कोरोनाला हद्दपार करण्याकडे प्रशासनाची आगेकुच. सोमवारच्या हवालात ८७ जण झाले कोरोना मुक्त ! तर प्रवरासंगमच्या एका जणाचा मृत्यु ! केवळ १८जण बाधित ! उपचार सुरु ! आज कुकाणा केवळ एक कोराना बाधित! तर नेवासा आरोग्य विभागातील एक अधिकारी यांना कोरोना?
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालूक्यात कोरोना या संसर्ग आजाराने हातपाय पसरविण्यास सुरुवात केल्याने नेवासा तालुक्यात  कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी तालूका आरोग्य विभाग मोठा सतर्क झालेला असून सोमवार (दि.२७) रोजी तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांना आलेल्या अहवालात सोमवारी ८७ रुग्णांनी कोरोना या संसर्ग आजारावर मात केलेली असून तालूक्यात केवळ १८ रुग्ण बाधित असून प्रवरासंगम येथील एका जणाचा आजच्या अहवालात मृत्यु झालेली नोंद करण्यात आली असून सोमवारी माञ एकच कुकाणा येथिल रुग्णांची नोंद झाली असल्याने तालूका आरोग्य विभागाने मोठी सतर्काता दाखविल्यामुळे कोरोना आजाराच्या मुसक्या आवळण्यात प्रशासन सज्ज झाल्याचे आलेल्या अहवालातून उघड होतांना दिसून येत आहे.
   लॉकडाऊन उघडल्यामुळे शहरातील माणसे आपल्या गावी येत आसल्याने ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तालूका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी यांनी आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा दिल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होतांना दिसत असून तालूक्याच्या दृष्टीने ही बाब मोठी आनंदात भर पाडणारी दिसत आहे. तालूका आरोग्य विभागाने कोरोना या संसर्ग आजाराच्या मुसक्या आवळण्यात सुरुवात केलेली असून लवकरच तालूका कोरोनामुक्त होईल असा आशावाद डॉ सुर्यवंशी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला आहे. आज उशिरा एका आरोग्य अधिकाऱ्यास कोरोणाची लक्षण असल्याची चर्चा  सुरू आहे. मात्र याबाबत तालुका प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचा अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.