Breaking News

पारनेर तालुक्यातील किन्ही येथे एक जण कोरोना बाधित !

पारनेर तालुक्यातील किन्ही येथे एक जण कोरोना बाधित !

पारनेर/प्रतिनिधी - 
  पारनेर तालुक्यामध्ये किन्ही येथे दोन दिवसापूर्वी एक जण कोरोना अहवाला मध्ये बाधित आला होता त्याच्या कुटुंबातील कोरोना चाचणी साठी स्राव घेण्यात आले होते ते अहवाल दि 21 जुलै रोजी प्राप्त झाले आहेत. त्यामधील 65 वर्षीय व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
    कोरोना चा वाढता संसर्ग हा ग्रामीण भागाकडे फैलावत आहे तालुक्यातील स्थानिकांना त्याचा प्रादुर्भाव होत आहे किन्ही येथील स्थानिक असलेल्या मात्र काही कारणास्तव जिल्हा बाहेर जाऊन आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर त्याच्या कुटुंबातील तपासणीसाठी स्राव घेतले होते
 त्यात कुटुंबातील 65 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे किन्ही तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत
दरम्यान काल रात्री आलेल्या अहवालात 33 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अळकुटी 19 ढवळपुरी 6 सारोळा अडवाई 3 वडझिरे 3 शिरापूर  3 कान्हूरपठार 1 या सहा गावांचा समावेश आहे.