Breaking News

अमरापूर सबस्टेशनच्या आवारात अधीक्षक अभियंता विनोद ढोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण !

अमरापूर सबस्टेशनच्या आवारात अधीक्षक अभियंता विनोद ढोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण
   शेवगाव तालुका प्रतिनिधी :
शेवगाव - रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने अमरापूर येथे 220/132 केव्ही विद्युत उपकेंद्राच्या आवारात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण नाशिक सिव्हिल विभागाचे अधीक्षक अभियंता मा.श्री.विनोद ढोरे,यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला.
      या आवारात नारळ,अशोका, पिंपळ,वड,जांभूळ,सुपारी,लिंब,आवळा,शेवगा,बाभूळ,रबर,बांबू आदी.200 देशी झाडे लावण्यात येणार असून त्याचे संगोपन केले जाणार असल्याचे श्री.विनोद ढोरे यांनी सांगितले.
     अमरापूर येथील सबस्टेशनचे काम तांत्रिक दृष्ट्या पूर्ण असून या सबस्टेशनसाठी औरंगाबाद जवळील थापती तांडा येथून वीज पुरवठा करण्यात येणार आहे.यासाठीच्या वीज टॉवरचे काम प्रगतीपथावर असून काम पूर्ण झाल्यानंतर अमरापूर सबस्टेशन कार्यान्वित होऊन शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सर्व गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे श्री.विनोद ढोरे यांनी सांगितले.
     या कार्यक्रमासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अहमदनगर मा.श्री.निशांत नामदे,उपकार्यकारी अभियंता अहमदनगर मा.श्री.महेश खेडकर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पुणे,मा.श्री.एस.एन रावळेकर,कनोर इलेक्ट्रिकलचे श्री.पवन बोबडे,तसेच रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे अध्यक्ष मा.श्री.किसनराव माने,उपाध्यक्ष डॉ.मनीषा लड्डा,क्लबचे सेक्रेटरी तथा अमरापूर पॅटर्नचे जनक श्री.बाळासाहेब चौधरी,माजी अध्यक्ष .डॉ.संजय लड्डा,माजी अध्यक्ष श्री.दिलीपराव फलके,माजी अध्यक्ष डॉ.भागनाथ काटे,माजी अध्यक्ष श्री.अण्णासाहेब दिघे,मा.प्राचार्य कारभारी नजन,आरसीसी क्लब अमरापूरचे अध्यक्ष महेश लाडणे,सेक्रेटरी दीपक भुक्कन,खजिनदार संतोष ढाकणे,बाळासाहेब सुसे,सुनीता शेटे,अनंत बोरुडे,शरद खैरे,संजय गरड,गणेश शेटे आदी.उपस्थित होते.
       या कार्यक्रमासाठी मास्क,सॅनिटायझर,सोशल डिस्टन्ससिंग व संपूर्ण शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.