Breaking News

संगमनेर तालुक्यात कोरोनाची 'वन डे फिफ्टी', दिवसभरात तब्बल ५१ कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात नवा विक्रम

संगमनेर तालुक्यात कोरोनाची 'वन डे फिफ्टी', दिवसभरात तब्बल ५१ कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात नवा विक्रम 

संगमनेर/प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यात आज (बुधवार दि.१५) दिवसभरात तब्बल ५१ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या चोवीस तासात अर्धशतकाच्या घरात कोरोना रुग्णांची नोंद झालेल्या संगमनेर तालुक्याचे नाव आता जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे. कोरोना विरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात अर्धशतक (वन डे फिफ्टी) करणाऱ्या संगमनेर तालुक्याने जिल्ह्यात नवा विक्रम तयार केला आहे. कोरोना बाधित असलेल्यांपैकी २१ रुग्ण तालुक्यातील कसारा दुमाला, तळेगाव दिघे, माहुली, निमोण, वडगावपान, साकुर आणि गुंजाळवाडी गावातील असून उर्वरित रुग्ण ३० हे संगमनेर शहरातील अभिनव नगर, नवीन नगर रस्ता, जनता नगर, भारत चौक, ऑरेंज कॉर्नर, ,मालदाड रस्ता,एकता चौक, शिवाजी नगर, नवघर गल्ली मेन रोड, भारत नगर, गणेश नगर भागातील आहेत. ज्यात घुलेवाडी येथील तीन वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. त्यामुळे दररोज समोर येणाऱ्या नवनवीन कोरोना बाधितांची संख्या नागरिकांच्या मनात धडकी भरवणारी ठरत आहे. संगमनेर तालुक्यात आज मिळून आलेल्या ५१ कोरोना बाधितांची संख्या मिळवता एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णांची आकडेवारी २८६ वर जाऊन पोहोचली आहे. तर आतापर्यंत तालुक्यात १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.