Breaking News

इंदोरीकर महाराजांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश.

संगमनेर/प्रतिनिधी
    पुत्रप्राप्ती इच्छिणाऱ्या दाम्पत्यांना सम आणि विषम तारखेचे गणित मांडणाऱ्या प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या विरोधात संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला. आज शुक्रवार दि.३  याबाबत सुनावणी करताना न्यायाधीशांनी इंदोरीकरांना दि.७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांना दि,७ ऑगस्ट रोजी स्वतः न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
    पुत्र प्राप्तीसाठी सम आणि विषम तारखेचे सूत्र सांगणारा त्यांचा व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित झाला होता. याबाबत ऍड. रंजना गवांदे यांनी दि.१७ फेब्रुवारी यांनी अहमदनगरच्या शल्यचिकित्सकांकडे पहिल्यांदा तक्रार केली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सह अनेक सामाजिक संघटनांनी याबाबत तक्रारी दिल्या. त्यानुसार राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या आदेशावरून संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांनी दि.१९ जून रोजी इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेर कोर्टात (वैद्यकीय कायदा) पीसीपीएनडीसी कायद्याचे कलम २२/१/२ प्रमाणे गुन्ह्याची करण्यात आहे.
     याप्रकरणात इंदोरीकर महाराज यांना जर जामीन घ्यायचा असला तरीही त्यांना दिलेल्या तारखेला न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा लागेल, आणि जर त्यांना गुन्हा मान्य नसेल तर त्यांना वरच्या कोर्टात दाद मागण्याची संधी देखील आहे.