Breaking News

पढेगावात ४ कोरोना बाधित तर तालुक्यात एकूण ७ बाधित !

पढेगावात ४ कोरोना बाधित तर तालुक्यात एकूण ७ बाधित !

करंजी प्रतिनिधी- 
दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथे ५० संशयितांचे स्वाब तपासणीसाठी पाठवलेले होते त्या पैकी आता सर्व अहवाल प्राप्त झाले असून ते ७ ही अहवाल पॉजिटीव्ह तर ४३ अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.     
   मागील २ दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील पढेगाव येथे एक युवक कोरोना बाधित आढळून आला होता आज त्याचा संपर्कातील पढेगाव येथील ४ रुग्ण बाधित आढळून आले आहे त्यात ६० व ३ वर्षीय पुरुष आणि ३१ व ३३ वर्षीय महिला असे ४ रुग्ण सापडल्याने पढेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    तसेच कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील अनुक्रमे ६७ व ७३ वर्षीय महिला आणि सुरेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष असे ७ कोरोना रुग्ण आढळुन आल्याने कोपरगाव तालुक्यातील आज पर्यंत कोरोना बधितांची संख्या ६४ झाली असून त्या पैकी ३० रुग्ण पूर्ण पणे बरे होऊन घरी परतले आहे  ही एक आनंदाची बाब असली तरी माहे एप्रिल मध्ये एक महिला रुग्ण मयत झाली असून सध्या तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या  ३३ झाली   आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाचे नियम काटेकोर पाळत काळजी घेणे गरजेचे आहे.