Breaking News

मंगल कार्यालयातील झाडे तोडली म्हणून चौघांना मारहाण

मंगल कार्यालयातील झाडे तोडली म्हणून चौघांना मारहाण 
पारनेर प्रतिनिधी - 
   पारनेर येथील हवलदार वस्ती येथे मंगल कार्यालयातील झाडे तोडली असे सांगितल्याचा समज झाल्याने झालेल्या वादांमध्ये पाच जणांनी चौघांना मारहाण केली त्यामध्ये चार जण जखमी झाले आहे त्याबाबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये अशा सुदाम चौधरी वय 38 वर्षे राहणार हवालदार वस्ती पारनेर हिने फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 21 जुलै रोजी हवालदार वस्ती पारनेर येथे फिर्यादीच्या घरासमोर शुभम भागाजी बुगे भागाजी खंडू बुगे शंकर भागाजी बुगे  मिराबाई भागाजी बुगे सोन्या ठाणगे सर्व राहणार बुगेवाडी पारनेर ता पारनेर जि. अ.नगर यांनी गैर कायद्याची मंडळी जमून फिर्यादीचे घरासमोर येऊन फिर्यादीचे पती सुदाम चौधरी यांनी आरोपी शुभम भागाजी बुगे याने मंगल कार्यालयातील झाडे तोडले असे त्याच्या वडिलांना सांगितले असा समज झाल्याने व त्याचा राग येऊन आरोपी यांनी फिर्यादीचे पती व दोन मुले यांना काट्याने मारहाण करून जखमी केले व लाकडी काठीने फिर्यादीचे डोक्यात व उजव्या हातावर मारून जखमी केले तसेच फिर्यादीचे पती व दोन मुले यांना मारून टाकण्याची धमकी दिली.
पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत