Breaking News

कोरोना संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी बेलापूर पोलिसांची धडक कारवाई मोहीम !

कोरोना संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी बेलापूर पोलिसांची धडक कारवाई मोहीम !
बेलापूर प्रतिनिधी - 
    कोरोना ह्या संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रादुर्भा वामुळे प्रशासनाने देखील कंबर कसली असून बेलापूर पोलिसांनी कोरोना रोगासंबंधात शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्याना  चांगलाच इंगा दाखवून कायद्याचा बडगा उगारला आहे .आज सावता महाराज मंदिर जवळ असलेल्या ओंकार किराणा स्टोअर्स चे मालक हरिप्रसाद सोमनाथ मंत्री यांनी कोरोणा कोव्हि ड 19हा संसर्गजन्य आजार माहीत असताना देखील त्याने स्वतः चे तोंडास मास्क न लावता तसेच सनि टयझर व खबरदारी न घेता दुकानात किराणा मालाचे गिऱ्हाईक करताना आधळून आल्याने कोरोना आजाराचा संसर्ग होऊन स्वतःचे व इतरांचे जीवितास धोका होईल, असे हलगर्जी पणाचे कृत्य केले व मा. जिल्हाधिकारी  अहदनगर यांचेकडील आदेशाचा भंग केल्यामूळे पो. कॉ.भोईटे  व पो.हे.कॉ.हापसे यांच्या फिर्यादीवरुन तपासी अधिकारी पो. हे. कॉ. ढोकणे यांनी गु रजी नं. व कलम ll ११९६/२०२० IPC १८८,२६९ नुसार  श्रीरामपूर चे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून घेतला आहे,तसेच दुसरा गुन्हा जकिर अझीम सय्यद रा.गोंधवणी श्रीरामपूर, याने तोंडाला मास्क न लावता मोटरसायकल वर विनाकारण फिरून सदर कोरोना आजार संसर्ग वाढण्याच्या हेतूने इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने त्याचेवरही गुन्हा दाखल केला आहे .