Breaking News

मुळा नदी पत्रात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू !

मुळा नदी पत्रात पाण्यात बुडून एकाचा मृत्यू !
 अकोले प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील किसन गोपाळा पापळे वय 70 वर्षे या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दीपक विठ्ठल पापळे  यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यू  रजिस्टर न 78/2020 सी आर पी सी 174 प्रमाने गुन्ह्याची नोंद केली आहे  दि 18 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजण्या पूर्वी ही घटना घडली सदर इसम हा दुपारी  मुळा  नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला होता त्यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला  त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे  यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस नाईक बी. बी. गोंधे पुढील तपास करत आहे
--