Breaking News

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णा मुळे कोपरगावतील बॅंक सॅनिटाइझग्रामीण भागातील कोरोना रुग्णा मुळे कोपरगावतील बॅंक सॅनिटाइझ
कोपरगाव/प्रतिनिधी :
कोपरगाव शहर कोरोना मुक्त होता होता परत एकदा दोन रुग्णामुळे चर्चेत आले आहे.याचा फटका कोपरगाव मधील आय डी बी आय बँकेला बसला असुन बँकेला आपली सर्व बँक व परिसर सॅनिटाइझ करावा लागला आहे.
 काल कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीतील वैजापूर रोड लगत असलेल्या परजने वस्ती शाळे नजीक वस्तीवर एका ३४ वर्षीय महिलेला वैजापूर येथील पोटाच्या उपचाराकरिता रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ती पुढील उपचारासाठी कोपरगाव येथील नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असता ती तेथील डॉक्टर ने कोरोना तपासणी साठी नासिक येथे पाठवले असता ती कोरोना पॉसिटीव्ह आढळून आली असता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतांना कोपरगाव येथील आय डी बी आय बँकेत देखील खबराट पसरली होती.
ग्रामीण भागातील सापडलेला महिला रुग्णाचा नातलग हा कोपरगाव येथील आय डी बी आय बँकेचा कर्मचारी असून तो बुधवारी सकाळी बँक मध्ये कामावर आला असता बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी सदर कर्मचाऱ्यास आपली मेडिकल चेकिंग करून येण्याचे सांगितले.
    त्या मुळे खबरदारी चा उपाय म्हणून बँक प्रशासनाने सर्व बँक व बँक परिसर सॅनिटाइझ करून घेतला, काही काळ बँकेचे सर्व व्यवहार  बंद करण्यात आले होते.