Breaking News

सरपंच, ग्रामसेवक यांनी जिल्ह्या बाहेरील व्यक्तींचे विलगीकरण करण्यासाठी हलगर्जीपणा करू नये : तहसीलदार ज्योती देवरे

सरपंच, ग्रामसेवक यांनी जिल्ह्या बाहेरील व्यक्तींचे विलगीकरण करण्यासाठी हलगर्जीपणा करू नये : तहसीलदार ज्योती देवरे
पारनेर/प्रतिनिधी : - 
     पारनेर तालुक्यांमध्ये सध्या कोरोना चा वाढता संसर्ग पाहता तालुक्यात जिल्हा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची संख्याही वाढत आहे या लोकांना गावांमध्ये येताच ग्राम सुरक्षा समितीच्या मार्फत विलगीकरण कक्षामध्ये ठेवणे बंधनकारक आहे मात्र अनेक गावांमध्ये विलगीकरण नियमाबाबत गांभीर्याने घेतले जात नाही  तहसीलदार ज्योती देवरे यांनी सरपंच ग्रामसेवक यांना बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण करण्यासाठी हलगर्जीपणा करू नये अशा प्रकारची सूचना दिली आहे.
   यामध्ये म्हटले आहे की पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना करण्यात येत आहे की त्यांनी जिल्हा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना ग्राम कोरोना दक्षता समितीच्या मार्फत तत्काळ विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात यावे जे कोणी व्यक्ती विलगीकरण कक्षामध्ये राहत नसतील त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याचे सक्त आदेश देण्यात येत आहे.
   सध्या कोरोना चा संसर्ग ग्रामीण भागामध्ये वाढत आहे त्यामुळे सरपंच ग्रामसेवक यांनी याबाबत गांभीर्याने गावातील बाहेरून येणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष ठेवावे  तसेच ज्या गावांमध्ये कोरोना बाधित व्यक्ती आढळून येतील त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तत्काळ माहिती घेऊन त्या व्यक्तींचे नावे तत्काळ प्रशासनाकडे कळवावीत याकामी सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये अशा प्रकारची सूचना देण्यात आल्या आहेत.