Breaking News

पुन्हा एकदा समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात अव्वल !

पुन्हा एकदा समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात अव्वल 
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
सी.बी.एस. ई.चा २०१९-२० चा इयत्ता १०वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत कु.संजना चेतन भुतडा हिने ९७ टक्के गुण मिळवुन अहमदनगर जिल्ह्यासह स्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. संजना भुतडा ही श्रीरामपूरचे सुप्रसिध्द वास्तुविशारद श्री.चेतन भुतडा व सौ.शीतल भुतडा यांची कन्या आहे.  तेजस सचिन आहेर याने ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमाक तर सुयोग मनिष कोठारी याने ९५.८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला, समता स्कूलचे या वर्षी ६८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.   समता स्कूल मधील ७ विद्यार्थी ९५ टक्के च्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये कु.संजना भुतडा, चि.तेजस आहेर, चि.सुयोग कोठारी, कु.कृतिका गोंदकर, चि.सिद्धांत नरवडे, चि.सी जगताप, चि.शंतनू होन आदि विद्यार्थांचा समावेश आहे. आदिशा ठोळे, राज गांधी, तेजस कवडे, तीर्थ ठोळे, भूमिका कदम, वैष्णवी गोरे, ख़ुशी भुतडा, तनिष्का अग्रवाल, शांभवी राहतेकर, योगेश्वरी गाडे, रेहान अत्तर, हर्षदा कवडे, नेतल लाहोटी, वसू अग्रवाल, तेजल वहाडणे, क्रिश पोरवाल या २३ विद्यार्थ्यांनी   ९० टक्के च्या पुढे गुण मिळवत यश संपादन केले आहे. ८५ टक्के च्या पुढे गुण मिळविणारे ३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सायली तागडे या विद्यार्थिनीने हिंदी विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहे. या विद्यार्थिनीस हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ.आढाव यांचे मार्गदर्शन लाभले.
  ‘समता इंटरनॅशनल स्कूल सलग ४ थ्या वर्षी जिल्ह्यात अग्रगण्य राहण्याची परंपरा राखत पुनः एकदा समता पॅटर्न यशस्वी केला आहे. कोरोनासारख्या अतिभयंकर महामारीच्या काळात कोणत्याही प्रकारचे परीक्षेबरोबरच कोरोनाचे मानसिक दडपण न घेता परिस्थितीनुरूप अभ्यास करत समता इंटरनॅशनल स्कूलचे २०१९-२० च्या इयत्ता १०वी चे विद्यार्थी सी.बी.एस.ई. पुरस्कृत अभ्यासक्रमांत उत्तुंग भरारी मारली आहे.’ असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी केले. 
तसेच त्या पुढे बोलतांना म्हणाल्या कि, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणुन नावारूपाला आलेली संस्था आहे. समता मधून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवीत असतो. ‘leave no child behind’ स्कूलच्या  ब्रीदवाक्याप्रमाणे समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील कोणताही विद्यार्थी आयुष्यात शैक्षणिकदृष्ट्या  कमी पडू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता आठवी पासूनच विद्यार्थ्यांसाठी  विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता १०वी ला आल्यानंतर गरजेनुसार गुणवत्तेनुसार शैक्षणिक,मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या  कष्टाचेच  फळ आहे’.
या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन उपप्राचार्य श्री.विलास भागडे, उपप्राचार्या सौ.शैला झुंजारराव, शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.