Breaking News

जिल्हा पषिदेतील वरिष्ठ अधिकार्‍याचा कोरोनाने मृत्यू- जिल्हा परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी बंद

जिल्हा पषिदेतील वरिष्ठ अधिकार्‍याचा कोरोनाने मृत्यू- जिल्हा परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी बंद
अहमदनगर/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याचा (वय ५०) मंगळवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना सकाळी जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने जिल्हा परिषदेचे मंगळवारी दिवसभराचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते.
जिल्हा परिषदेमध्ये ते एक वरिष्ठ अधिकारी होते. दहा दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना नगर येथील एका कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्ग शोकमग्न झाला. हे अधिकारी मूळचे संगमनेरचे आहेत. सध्या ते नगरमध्येच राहत होते. त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावरही नगरमधील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. वरिष्ठ अधिकार्‍याच्या निधनाची बातमी जिल्हा पषिदेत धडकताच कर्मचारी वर्ग शोकमग्न झाला.  त्यांच्या निधनामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते.
-----------------------------