Breaking News

श्रीगोंदा तालुक्यातील घारगांवातही कोरोनाचा शिरकाव !

श्रीगोंदा तालुक्यातील घारगांवातही कोरोनाचा शिरकाव.
श्रीगोंदा तालुका/प्रतिनिधी : -
   घारगांव येथील ७५ वर्षीय व्यक्ती करोनाबाधीत. सदर रूग्णाशी सबंधीत ३ जणांना कॉरंटाईन करण्यात आले असून सदरील रूग्ण नगर येथे काही दिवसांपूर्वीच एका खाजगी रुग्णालयात अॅडमीट झालेले होते  त्यांना तेथेच कोरोना संसर्ग झाला. 
     तरी घारगांवकरांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी दिला आहे.
तसेच तालुक्यातील चिभंऴा व महाडूंऴवाडी येथील प्रत्येकी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर यांनी सांगितले तसेच तालुक्यातील 72अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे डॉ खामकर यांनी सांगितले.