Breaking News

हिरडगाव येथे बारा ते तेरा लाखाची चोरी; चोरीमध्ये चोरांची झाली दिशाभूल !

हिरडगाव येथे बारा ते तेरा लाखाची चोरी; चोरीमध्ये चोरांची झाली दिशाभूल  

 श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी :
    श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे भास्कर आबासाहेब भुजबळ (भुजबळ वस्ती) यांच्या घरी आज रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास मोठी चोरी झाली. सुमारे वीस तोळ्याचे दागिने आणि अडीच लाख रुपये रोख असा १२ ते १३ लाख रुपयांचा ऐवज चोरांनी लांबविला. चोरट्यांनी दरवाजा कटावणीने उघडून घरात प्रवेश केला. घरातील झोपलेल्या लोकांना ओलांडून कपाटामध्ये असणारा हा सर्व ऐवज चोरट्यांनी लांबविला.  रात्री दोन अडीचच्या दरम्यान हिरडगाव च्या भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरी झालेल्या चोरीमध्ये काही बेन्टेक्स बांगड्या होत्या व त्याबरोबर दोन तोळ्याचा पुणे येथे खरेदी केलेला एक सोन्याचा हार होता परंतु तो फिकट पिवळा असल्यामुळे तो हार बनावट समजून बेन्टेक्स च्या बांगड्या बरोबर चोरांनी शिवाजी भुजबळ यांच्या वीट भट्टी जवळ टाकून दिला. दरम्यान अहमदनगर येथून श्वानपथक आल्यानंतर पथकाने चोर  गेलेला मार्ग दाखवला. पोलीस उपअधीक्षक  श्री.संजय सातव पोलिसांसह घटनास्थळी उपस्थित राहुन घटनास्थळाची पहाणी केली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.