Breaking News

देवळाली प्रवरात कोरोनाचा पहिला बळी !

देवळाली प्रवरात कोरोनाचा पहिला बळी !
देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
              देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत पशु वैद्यकीय क्षेञाशी संबधित एक जण नऊ दिवसा पुर्वी कोरोना बाधित आढळला होता .त्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार चालू होते. परंतू उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही.अखेर गुरवारी सकाळी त्या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.देवळाली प्रवरातील कोरोना बाधीत पहिला बळी गेला आहे. नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे. 
                 याबाबत  सविस्तर माहिती अशी की, नगर पालिका हद्दीतील जुना गणेगाव रस्ता लगत राहणाऱ्या पशु वैद्यकीय संबधित व प्रगतशिल शेतकरी याचा कोरोना बाधीत असल्याचा अहवाल दि.21 जुलै रोजी आला होता.देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आण्णासाहेब मासाळ यांनी त्या रुग्णास  प्रथम कृषी विद्यापीठात स्ञाव घेण्यासाठी पाठविले स्ञाव घेतल्या नंतर सायंकाळी जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता  विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यावचर उपचार चालू असतानाच त्याची प्रकृती खालवत गेली. जिल्हा रुग्णालयातील  वैद्यकीय पथकाने शर्तीने उपचार केले.गुरवारी सकाळी त्या रुग्णाची प्राणज्योत मावळली.त्या रुग्णाच्या पाठोपाठ त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे स्ञाव तपासणीसाठी घेण्यात आले.त्यामध्ये रुग्णाचा पुतण्या बाधीत निघाला होता.त्यावर उपचार करण्यात आले. उपचार घेवून तो घरी आला आहे.
                    त्या रुग्णाच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय , पुतण्या पुतणी  असा परीवार असून त्याचा अत्यंविधी नगर माहापालिकेच्या  पथकाने नगर येथील अमरधाम मध्ये करण्यात आला. 
                  
कोरोना रुग्णाच्या मृत्यू बाबत अधिकारी अभिज्ञन
        देवळाली प्रवरा येथील कोराना बाधीत रुग्ण नऊ दिवसाच्या उपचारा नंतर गुरवारी सकाळी  निधन झाल्याचे वृत्त देवळाली प्रवरात येवून धडकताच प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी यांनी दुपारी  तहसिलदार, मुख्याधिकारी , आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींना भ्रमणभाषवर  संपर्क साधुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वरील अधिकाऱ्यांनी आम्हाला वरुन कोणतीही माहिती मिळालेली नाही आसे सांगुन प्रसार माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला.