Breaking News

राफेल दाखल; वॉटर सॅल्युटने स्वागत- पाचही विमानांचे अंबाला एअरबेसवर आगमन !राफेल दाखल; वॉटर सॅल्युटने स्वागत
- पाचही विमानांचे अंबाला एअरबेसवर आगमन
नवी दिल्ली/प्रतिनिधी
भारतीय वायुसेनेची ताकद आता आणखी वाढली असून, प्रâान्समधून उड्डाण घेतल्यानंतर बुधवारी पाचही राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाले आहेत. हरियाणाच्या अम्बाला एअरबेसवर ही विमाने सुरक्षित पोहोचली. तेथे त्यांचे वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी हवाईदलाचे प्रमुख आरकेएस भदौरियादेखील उपस्थित होते.
प्रâान्सकडून पहिल्या पाच राफेल विमानांची खेप भारताला देण्यात आली आहे. बाकीची विमाने पुढच्या वर्षात दाखल होतील. ही राफेल विमाने मंगळवारी प्रâान्सहून रवाना झाली, त्यानंतर ते युएईमध्ये थांबले आणि बुधवारी दुपारी अंबाला येथे पोहोचले आहेत. दरम्यान, भारताच्या या सर्वोत्तम लढाऊ विमानांनी उड्डाण केल्यानंतर सर्वात प्रथम भारतीय नौदलाच्या आएनएस कोलकाताशी संपर्क साधला. आयएनएस कोलकाता ही सध्या पश्चिमी अरबी समुद्रात तैनात आहे. त्यानंतर ज्यावेळी राफेलच्या ताफ्याने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश केला, त्यावेळी त्यांना घेण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी दोन सुखोई ३० लढाऊ सज्ज होती. राफेल भारतीय हवाई दलात दाखल झाल्याने भारताची सामरिक शक्ती वाढणार आहे. यामुळे भारतीय सैन्यशक्तीचा एक नवा काळ सुरु झाल्याचे जाणकारांचे मत आहे. राफेल बरोबरच भारताने हॅमर क्षेपणास्त्रांची खरेदीही केली आहे.
--
राफेल विमाने गेमचेंजर वगैरे ठरणार नाहीत : शरद पवार
---------
राफेल विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणे ही आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. पण, ही विमाने गेमचेंजर वगैरे ठरणार नाहीत. त्यामुळे चीनची चिंता वाढेल असे मला वाटत नाही, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.