Breaking News

साईबाबा काॅर्नर ते टाकळी फाटा दरम्याने गतिरोधकांचे काम सुरू !

साईबाबा काॅर्नर ते टाकळी फाटा दरम्याने गतिरोधकांचे काम सुरू
   ( तसेच टोल कंपनी मार्फत मार्गावरील   ड्रेनेजचेही  काम मार्गी लागणार )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
नगर-मनमाड हायवे वरील साईबाबा काॅर्नर ते टाकळी फाट्या  दरम्यान असलेल्या गतिरोधकांवर व शेजारी   कोणत्याही प्रकारचे अथवा आवश्यक  फलक नसल्यामुळे अनेक अपघात होवुन अनेकांना प्राणही गमवावे लागले. याची दखल घेत युवा नेते व संजीवनी फाउंडेशनचे सचिव श्री सुमित कोल्हे यांनी  टोल कंपनीचे अधिकारी श्री मोहम्मद शेख  यांना गतिरोधकावर रंगाचे पट्टे ओढणे, कॅटाईट रिफ्लेक्टर टाकणे, रस्ता दुभाजकांवर रेडीयम प्लेटस् लावणे संदर्भात निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत टोल कंपनीने टाकळी फाटा गतीरोधकांसुन श्री सुमित कोल्हे यांचेच हस्ते उद्घाटन करून कामाचा शुभारंभ  केला.
यानंतर साईधाम कडे जाणाऱ्या  रस्त्याजवळील गतीरोधकावर काम सुरू करण्यात आले. त्या ठिकाणीही श्री कोल्हे यांनी भेट दिली असता     परिसरातील  कालीका नगर, फडके प्लाॅट व शारदा नगर येथिल नागरीकाना सुमित कोल्हे तेथे असल्याचे  समजले. काही नागरीकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी कोल्हे यांची भेट घेवुन महामार्गावरील पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेला नाली नसल्यामुळे आमच्या वसाहतींमध्ये साचते, त्यामुळे आरोग्याचे प्रष्न निर्माण होत आहे. श्री कोल्हे यांनी लागलीच टोल कंपनीचे प्रतिनिधी शेख  यांना साईड ड्रेनेज  बाबत विचारले असता शेख  यांनी सांगीतले की रस्त्याच्या मध्यापासुन १० ते १२ मीटर अंतरावर नगरपालीकेची  पाण्याची पाईप लाईन गेली आहे.  आम्हाला नगरपालीकेचा ना हरकत दाखला मिळत नाही, आम्हाला तो मिळाला तर आम्ही करून देवु असे सांगीतले. यावर श्री कोल्हे यांनी नगरपालीकेचे संबंधित अधिकारी श्री ज्ञानेश्वर  चाकणे यांना बोलविले व विचारले की ना हरकत दाखला देण्यास काय अडचण आहे. त्यावर  चाकणे यांनी सांगीतले की त्यांनी मागीतलाच नाही. हा विसंवाद लक्षात येताच त्यांनी नगरपालीकेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत  सरोदे यांच्याशी  संपर्क साधला. यावर श्री सरोदे यांनीही संमती दर्शवली. तथापी, आपण नागरीकांच्या उपस्थितीत सोमवारी, परीसरातील नगरसेवक यांचे समवेत चर्चा करून त्यांचे प्रश्न  सोडवु असे श्री सरोदे यांनी सागीतले.
   यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्री विजय वाजे, सहकार महर्षी  कोल्हे  कारखान्याचे संचालक श्री प्रदिप नवले, माजी सभापती श्री सुनिल देवकर,विवेक  सोनवणे, परीसरातील नागरीक तुशार जमधडे, भागवत उकिर्डे, प्रदिप चांदर, कैलास सोमासे, संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
  
[ यावेळी श्री सुमित कोल्हे यांनी टोल कंपनीचे अधिकारी यांना सांगीतले की सध्या साईबाबा काॅर्नर ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे काम चालु आहे. संजीवनी फाउंडेशनने या रस्त्याच्या कडेला दुतर्फा झाडी लावुन त्याचे संगोपन करण्याची परवानगी पी. डब्ल्यु. डी कडे मागीतली असता ती त्यांनी दोन दिवसापुवीच आम्हाला दिली. तशी  परवानगी साईबाबा काॅर्नर ते टाकळी फाटा दरम्यान द्यावी. यावर श्री शेख  यानी ती लागलीच दिली. कोल्हे यांचे प्रयत्नातुन गतिरोधकाची व साईड डॅªनेजचीकामे व कडेला वृक्ष लागवड होणार असल्यामुळे नागरीकांना समाधन व्यक्त केले ]