Breaking News

स्व सॉ. गुलाबराव शेळके पुण्यतिथी निमित्ताने आमदार निलेश लंके यांच्या हस्ते वृक्षरोपण !

स्व सॉ. गुलाबराव शेळके पुण्यतिथी निमित्ताने आमदार निलेश लंके यांच्या हस्ते वृक्षरोपण !
जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या चौथ्या पुण्यतिथी दिनी पारनेर तालुक्यातील प्रिंप्री जलसेन येथे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते शक्तीस्थळी वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद, माजी सरपंच लहू थोरात व ग्रामस्थ.

 निघोज प्रतिनिधी :
जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांनी सहकाराच्या माध्यमातून राज्यातील सहकार चळवळीला गतवैभव प्राप्त करुन देत सर्वसामान्य जनतेला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले आहे. जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारनेर तालुक्यातील पिंप्रीजलसेन येथे रविवार दि. 26 रोजी  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार लंके यांनी येथील शक्तीस्थळाला भेट देउन सॉलिसिटर स्व गुलाबराव शेळके साहेब यांना अभिवादन करीत पुष्पांजली अर्पण केली. यावेळी आमदार लंके व बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच आमदार लंके यांच्या हस्ते दत्तकृपा सहकारी पतसंस्थेच्या  सॉलिसिटर गुलाबराव शेळके सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, जी एस महानगर बॅंकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, माजी सरपंच व दत्तकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष लहू थोरात सरपंच शेउबाई घेमुड, उपसरपंच संदीप काळे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य धुमाळ सर, तालुका पत्रकार संघाचे  मार्गदर्शक  दत्ता उनवणे, गांजीभोयरे सरपंच डॉक्टर आबासाहेब खोडदे, निघोजचे सरपंच ठकाराम लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सचिव शांताराम कळसकर, माजी विश्वस्त नानापाटील लंके, माजी सरपंच बाळासाहेब दिघे, शिवाजी औटी, वसंतराव मोरे, तुकाराम बेलोटे बाजार समितीचे संचालक संजय भगत, आण्णासाहेब बढे, अशोक  मेसे,  सोपान मते, निवृत्ती आडसरे आदी विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार लंके यावेळी म्हणाले आपल्या तालुक्यासाठी सॉलिसिटर शेळके साहेब यांचे योगदान फार मोठे आहे. सातत्याने गोरगरीब गरजू घटकांना आपल्या माध्यमातून फायदा झाला पाहिजे त्यांचा आर्थिक विकास होउन तालुका जिल्हा यांचा आर्थिक स्तर उंचावत आपला माणुस समाजात सन्मानाने उभा राहिला पाहिजे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. जी एस महानगर बॅंकेचे अध्यक्ष अॅड उदय शेळके व गितांजली शेळके यांनी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून राज्यात चांगले काम केले आहे. अॅड उदय शेळके यांनी जी एस महानगर बॅंकेला नावलौकीक मिळवून देत सॉलिसिटर शेळके साहेब यांच्या सामाजिक कामांचे अनुकरण करीत बॅंक प्रगतीपथावर आणली आहे अशाप्रकारे अनुकरणीय काम समाजात होणे आवश्यक असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी आपल्या भाषणात सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेतकऱ्यांसाठी ते अहोरात्र काम करीत होते. देशाचे नेते शरद पवार साहेब यांचे ज्येष्ठ सहकारी म्हणून काम करताना त्यांनी सहकारात सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी काम केले. जी एस महानगर बॅंकेचे अध्यक्ष अॅड उदय शेळके व गितांजलीताई शेळके यांचे पाणी फौंडेशन माध्यमातून काम तालुक्याला भुषनास्पद असून ग्रामस्थांचे पाठबळ त्यांना मिळत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद, माजी सरपंच लहू थोरात आदिंची भाषने झाली.