Breaking News

संगमनेर तालुक्यात आणखी ३० कोरोना संक्रमित; एकाचा दुर्दैवी मृत्यू !

संगमनेर तालुक्यात आणखी ३० कोरोना संक्रमित; एकाचा दुर्दैवी मृत्यू
संगमनेर/प्रतिनिधी :
    संगमनेर तालुक्यात आज (बुधवार दि.२२) आणखी तीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर काल (मंगळवार दि.२१) रात्री उशिरा एका व्यक्तीचा संक्रमणातून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारी ग्रामीण रुग्णालयातून मिळालेल्या अहवालात २४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ज्यात शहरातील आठ, तालुक्यातील नांदुरीदुमाला येथील आठ, पिंपळगाव डेपा तीन, शिबालापूर दोन आणि घुलेवाडी, रायते व निमगावजाळी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय खाजगी लॅब मधून सहा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहे. ज्यात संगमनेर शहरातील मोगलपूर आणि भारतनगर भागातील प्रत्येकी एक आणि कुरण, गुंजाळवाडी, राजापूर व पेमगिरी येथील प्रत्येकी एक रुग्ण संक्रमित आढळला आहे. काल रात्री उशिरा संगमनेर शहरातील पद्मानगर येथे राहत असलेली व्यक्तीला संक्रमणातून त्रास होत असल्यामुळे येथील एका खाजगी रुग्णालयातून अहमदनगर येथील धूत हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले होते. परंतु उपचारादम्यान या बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यासह तालुक्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ४५६ इतकी झाली असून संक्रमणातून मृत्यू पावलेल्यांची संख्या अठरा वर जाऊन पोहोचली आहे.