Breaking News

शिवशंकर विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल-९९.४२%

शिवशंकर विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल-९९.४२%
करंजी प्रतिनिधी- 
    कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या, रवंदे येथील शिवशंकर विद्या मंदिर चा मार्च २०२० माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९९.४२ % लागला आहे. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सांगळे बी. के.यांनी दिली.
यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु.काळे चैताली शंकर  ५०० पैकी ४७७ गुण मिळवत ९५.४५% टक्के मिळून पास झाली आहे तर दुसरा क्रमांक कु.उगले पल्लवी आबासाहेब ५०० पैकी ४७३ गुण मिळवत ९४.६०% व तिसरा क्रमांक
 कु.कदम तृप्ती रवींद्र ५००पैकी ४६६  गुण मिळवून ९३.२३% मार्क मिळवत पाहिल्या तीन क्रमांकाची  मुलींनीच बाजी मारली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय श्री.बाळासाहेब कचरू पा.कदम, सदस्य श्री.पी.डी.काळे व श्री.साहेबराव काशिनाथ पा. कदम, सरपंच सौ.कविताताई सोनवणे,श्री.संजय कंक्राळे,श्री.बाबासाहेब घायतडकर, श्री.अशोक मामा काळे, श्री.सुभाष दवंगे, मुख्याध्यापक श्री.सांगळे बी.के, पर्यवेक्षक श्री बिरे बी.आर.आणि सर्व सेवक वृंद, तसेच पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.