Breaking News

जनता विद्यालयाचा दहावीचा निकाल आश्चर्यकारक, विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !

जनता विद्यालयाचा दहावीचा निकाल आश्चर्यकारक, विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !
 घोटण/प्रतिनिधी:
 शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची एकमेव शाखा आहे. पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग आहेत कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत संस्थेची शाखा असल्याने विशेष महत्त्व आहे.नुकत्याच जाहिर झालेल्या  दहावी मार्च २०२० परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या घोटण येथील जनता विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.                          
     विद्यालयाचा शेकडा निकाल - ९५.८३% एवढा लागला असुन सेमी माध्यमाचा निकाल १००% लागला आहे. कु. बंगरे राणी देवमन हिने ९२.८०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर बन ऋषीकेश एकनाथ याने ९१.४०% गुणांसह द्वितीय क्रमांक व  कु. शेळके ऋतुजा दिलीप हिने ९०.४०%   गुणांसह  तृतीय क्रमांक मिळवला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.श्री.संजय नागपुरे , संस्थेचे जनरल बाँडी सदस्य शिवशंकरदादा राजळे, स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष नानापाटील मोटकर, जेष्ट सदस्य श्री.विठ्ठलराव घुगे,श्री.लक्षमणराव  टाकळकर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गर्जे डी.डी.यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.टकले बी.एन., श्री राठोड बी.डी.,श्री.गलांडे टि.व्ही.,श्री.कटके यु.जी.,श्री.शिंदे जी.डी.,श्री.खाटीक एस.वाय.,श्री.ढाकणे एम.के.,सौ.गरड एन.एन.,श्री.साखरे एम.एस.,श्रीम.घुगे टी.के.,श्री.बडधे एन.बी.,श्रीम.तांदळे ए.ए.,श्री.तांबे जी.टी.,श्रीम.घुगे एस.के.,श्री.गोसावी श्री.तोगे ए.ए. यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसर आश्चर्यकारक म्हणजे याच महाविद्यालयातील विद्यार्थी घुगे अमोल नवनाथ याने सर्व विषयात ३५ मार्क मिळून टक्केही शेकडा ३५% घेतल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे,त्याच्या आश्चर्यकारक निकालाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहेत अमोल हा सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे. दहावीत असताना वडिलांना शेतीच्या कामामध्ये मदत करून मिळवलेल्या यशाने समाधानी आहे. तसेच या आश्चर्यकारक निकालामुळे वडिलांचे देखील कौतुक झाल्यामुळे वडिलांनी समाधान व्यक्त केले असल्याने अमोल च्या पुढील शिक्षणासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच सैन्य दलात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे यावेळी अमोलने सांगितले आहे.