Breaking News

पारनेर तालुक्यात आज सात कोरोना बाधित तर २१ अहवाल निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज सात कोरोना बाधित तर २१ अहवाल निगेटिव्ह !
---------
पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील कोरोना चा आलेख वाढत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यातील सात व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.
ढवळपुरी १ पाडळी दर्या १ म्हसोबा झाप १ तिखोल २ सुपा १  एक कोरोना बाधित व्यक्तीचा पत्ता पारनेर झाला आहे तो सध्या केडगाव  भूषण नगर येथे राहत असून मूळ तो दैठणे गुंजाळ येथील आहे. तालुक्यात आज एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
      तर २१ संशयित व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात नांदूर पठार १ जातेगाव १ सुपा १ देवीभोयरे २ टाकळी ढोकेश्वर ३ रांधे ११ कान्हूर पठार २  या गावातील २१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
ज्या परिसरात कोरोना बाधित व्यक्ती आहेत तो १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असल्याची आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.