Breaking News

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन

- बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटरला कोरोना

मुंबई/प्रतिनिधी 
राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोना झाल्याचा अहवाल आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यांचे स्वॅब घेण्यात आलेअसून, तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कोरोनाने सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही विळखा घातला आहे. आता राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले. कारण त्यांच्या शासकीय निवासस्थानातील टेलिफोन ऑपरेटरचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. थोरात यांच्यासह 20 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची आता प्रतीक्षा आहे.