Breaking News

वडारवाडी, नागरदेवळे सह बुर्‍हाणनगर बंद, उमेश पाटील. नगर तहसीलदार

 
वडारवाडी ,नागरदेवळे सह बुर्‍हाणनगर  बंद, उमेश पाटील .नगर तहसीलदार
 भिंगार प्रतिनिधी :
 नगर तालुकयातल्या वडारवाडी , नागरदेवळे सह बुर्‍हाणनगर  ग्रामपंचायत हद्दीतल्या  भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर तहसीलदार श्री उमेश पाटील यांनी १७/७/२०  सकाळी सहा वाजल्यापासून ते ३१ /७/२० रोजी च्या मध्यरात्री पर्यंत या तीनही ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अस्थापना (औषधे दुकाने व दवाखाना वगळून ) बंद राहतील व उकत्त कार्यक्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू राहील असे आदेश काढले आहेत  .सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक, मंडळाधिकारी , वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक ,  तलाठी व ग्रामसुरक्षा समिती यांची नेमणूक केलेली असुन  पोलीस निरीक्षक , भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व  पोलीस निरीक्षक , नगर तालुका पोलीस स्टेशन यांना योग्य ते बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .