Breaking News

सुपा येथे कुऱ्हाड व भाल्याने मारहाण करून एकाचा निर्घृण खून !

सुपा येथे कुऱ्हाड व भाल्याने मारहाण करून एकाचा खून 

पारनेर/प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील सुपा येथे तिघा जणांनी एक जनाला कुऱ्हाड लोखंडी भाला लाकडी काठीने बेदम मारहाण केली त्यामध्ये तो व्यक्तीजागीच ठार झाला त्याबाबत तिघाविरोधात सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सुपा पोलिस ठाण्यात पाशम घेसीम घिसाडी वय 25 धंदा भंगार सामान विकणे मूळ राहणार  घोडेबाजार भुसावळ रेल्वे स्टेशन जवळ ता भुसावळ जि जळगाव हल्ली राहणार सिम्स हॉस्पिटल पाठीमागे सुपा ता पारनेर जि अहमदनगर याने  फिर्याद दिली आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वल्ली व्यंकेस भोसले, शेकू व्यंकेस भोसले, रुक्मिणी व्यंकेस भोसले या तिघांनी दि. 12 रोजी रात्री 7.30च्या सुमारास फिर्यादीच्या राहते घरासमोर मयत धेसीम निचंकी घिसाडी वय 50 हा आरोपी यांना तुम्ही चोऱ्या करू नका आपल्याला त्रास होईल असे म्हणाला असता त्यास तिघा आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून कुऱ्हाड लोखंडी भाला व लाकडी काठीने मारहाण करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारून आरोपी तेथून पळून गेले याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये  तिघां आरोपींविरोधात खुणा च्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबत सुपा पोलिसांनी रुक्मिणी व्यंकेस भोसले हिस अटक केली आहे दोन आरोपी अद्याप फरार आहेत याबाबत शोध सुरू आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले करत आहेत.