Breaking News

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर

- महाराष्ट्राचा निकाल 98.05 टक्के


नवी दिल्ली/प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल बुधवारी दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी एकूण 18 लाख 89 हजार 878 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 18 लाख 73 हजार 15 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 17 लाख 13 हजार 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी महाराष्ट्राचा सीबीएसईदहावीचा निकाल 98.05 टक्के तर देशभरात 93 टक्के मुली आणि 90 टक्के मुले उत्तीर्णझाले आहेत. विद्यार्थी www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. विद्यार्थी वेसबाईट्स याशिवाय एसएमएस, डिजीलॉकर आणि उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकत आहेत. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

असा पाहता येईल निकाल : 
1) cbse.nic.in , www.results.nic.in , www.cbseresults.nic.in या वेबसाईट्सवर पाहू शकता
2) डिजीलॉकर अ‍ॅप
3) उमंग अ‍ॅप
4) एसएमएस - टाइप "CBSE10 (स्पेस) (रोल नंबर) (स्पेस) (ऍडमिट कार्ड आयडी)’