Breaking News

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख, कुरण गावातील २२ जण कोरोना पॉझिटिव्ह

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कुरण गावात आज रविवार दि.५ रोजी तब्बल २२ जण कोरोना पॉझिटिव असल्याचे निष्पन्न झाले आहे. सकाळी शहरातील नाईकवाडपुरा भागातील एक ४६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असताना संध्याकाळ होता होता कुरण गावातील तब्बल २२ जण कोरोना बाधित आढळल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. कुरण गावात मिळून आलेल्या कोरोना संक्रमितांत एकूण १२ महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे आता कुरण गावातील कोरोना बाधितांची संख्या ३८ इतकी झाली असून तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १४९ वर जाऊन पोहोचली आहे.