Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या विदयालयाची निकालाची उज्ज्वल परंपरा कायम. !

न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या विदयालयाची निकालाची उज्ज्वल  परंपरा कायम.   
 पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विदयालयाचा इ.१०वी(एस.एस.सी.परीक्षा मार्च 2020) निकाल 99.16टक्के लागला आहे.या निकालाचा तपशील पुढीलप्रमाणे परीक्षेला बसलेले विद्यार्थी 239 उत्तीर्ण विद्यार्थी 237 विशेष श्रेणी मिळविणारे विद्यार्थी 123 प्रथम श्रेणी मिळविणारे विद्यार्थी 87                                                द्वितीय श्रेणी मिळविणारे विद्यार्थी 26 तृतीय श्रेणी मिळविणारे विद्यार्थी O1 विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक  कु.लोंढे निकिता राजेंद्र 96.40  कु.गाढवे ऋतुजा चंद्रकांत 95.40 कु.शिरोळे आभा महेश 95.40  चि.थोरात विमलेंद्र शिवाजी 94.80 कु.खोडदे स्नेहल संभाजी  94.60 कु.परदेशी श्रुती दिगंबर 94.20 या निकालाचे वैशिष्टय म्हणजे विदयालयातील 28 विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमारजी झावरे, उपाध्यक्ष रामचंद्रजी दरे ,सचिव जी.डी.खानदेशे,जेष्ठ विश्वस्त सितारामजी खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती  राहूलभैय्या झावरे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री.मुकुंद जासुद, उपप्राचार्य श्री.संजय कुसकर,ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक बाळासाहेब करंजुले,पर्यवेक्षक सुनील वाव्हळ,जेष्ठ शिक्षक बापूराव होळकर यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक,यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन केले आहे.