Breaking News

पढेगावात कोरोनाचा रुग्ण आढळला, तिन दिवस गाव बंद राहणार !

पढेगावात कोरोनाचा रुग्ण आढळला, तिन दिवस गाव बंद राहणार !
कोपरगाव प्रतिनिधी-  
कोपरगाव तालुक्यात आज सकाळीच  शहरातील  डॉक्टर च्या संपर्कातील ३ बाधित रुग्ण आढळुन आले होते, त्या नंतर आता दुपारी १ वाजता आलेल्या रिपोर्ट नुसार तालुक्यात परत २ रुग्णाची भर पडली असून यात कोपरगाव शहरातील गांधीनगर च्या गजबलेल्या परिसरात एक ५२ वर्षीय पुरुष नाशिक येथील पाठवलेल्या खाजगी लॅब च्या अहवालानुसार पॉजिटीव्ह आढळून आला आहे.

     कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील पढेगाव येथील एक ३३ वर्षीय इसम कोरोना बाधित आला असल्याची माहिती तालुका ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

   पढेगावात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता.तरी आजपर्यंत शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करत व्यवहार सुरळीत सुरु होते.मात्र आज पहिलाच रुग्ण आढळून आल्यामुळे सरपंच ,ग्रामसेवक,तलाठी यांनी तातडीने गावात बाधित रुग्णाच्या वस्ती शेजारील अर्धा किलोमीटरचा परिसर कंटनमेंट झोन म्हणुन जाहीर केला असुन तातडीने परिसरात औषध फवारणीही करण्यात आली असुन,खबरदारीचा उपाय म्हणुन पुढील तिन दिवस गाव पुर्णपणे बंद ठेवण्यात आले असल्याचे जाहीर केले असुन,आरोग्य विभागाने तुर्तास बाधित रुग्णाचे कुटुंब होम क्वारंटाईन केले असुन उद्या ते कुटुंब कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी नेण्यात येणार असुन,पुढील दहा दिवस आरोग्य विभागाची या परिसरावर देखरेख असणार आहे.