Breaking News

पाथर्डी तालुक्यातील माळेगाव येथे चोरी; रोख रक्कम,सोने व मोबाईल चोरीला गेल्याची माहिती

पाथर्डी/प्रतिनिधी :
    तालुक्यातील माळेगाव येथे अजीनाथ भगवान एकशिंगे यांच्या राहत्या घरी दोन अज्ञात चोरट्याने रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरी केली. याबाबत पाथर्डी पोलिसांना एकशिंगे यांनी माहिती दिली.
     संबंधित चोरीत रोख कपाटातील रोख रक्कम ५० हजार,दोन ते तीन तोळे सोने,मोबाईल असा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची विश्वसनीय सुत्रांकडून प्राथमिक माहिती मिळत आहे.