Breaking News

एका राजकीय पक्षाने स्वतःच्या हिमतीवर उघडलेलं हे पहिलं कोविड केअर सेंटर - माजी आ. विजय औटी

एका राजकीय पक्षाने स्वतःच्या हिमतीवर उघडलेलं हे पहिलं कोविड केअर सेंटर - माजी आ. विजय औटी
-------
पारनेर येथे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास बेडचे कोविड रुग्णालयाचे लोकार्पण !
-------
  पारनेर/प्रतिनिधी - 
शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा यांनी कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता रक्तदानासह सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरे करावेत असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्यातील पहिले शिवसैनिकांनी अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्यामुळे याचा फायदा पारनेर तालुक्यातील रूग्णांना होणार आहे असा आशावाद विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या यांनी व्यक्त केला आहे. 
 शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दि.२७ जुलै रोजी पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पारनेरमध्ये ५० बेडचे कोव्हिड रूग्णालयाचे लोकार्पण माहिती विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी व संंपर्ककप्रमुख भाऊ कोरेगावकरांच्या उपस्थितीत झाले .यावेळी माजी आ.औटी म्हणाले की जागतिक महामारिच्या संकटात देशासह महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदर्श कामगिरीची दखल घ्यावी लागणार आहे.सोशलमिडियावर महाराष्ट्र जनतेला रक्तदानाचा आवाहन केले होते त्यामुळे या आवाहनाला  रक्तदान शिबीर आयोजन करून समाजाला उपयोगी कार्यक्रम राबविले आहे. २० लक्ष रुपयांचा निधी शिवसैनिकांनी या कोव्हिड सेंटरसाठी दोन दिवसात उपलब्ध करून दिला असुन याचा फायदा समाजाला होणार आहे. 
 यावेळी विधानसभा माजी उपाअध्यक्ष विजय औटी यांच्यासह उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले  सभापती काशिनाथ दाते सभापती गणेश शेळके माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी  प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार ज्योती देवरे नगराध्यक्षा सौ वर्षा नगरे दुधसंघाचे अध्यक्ष राहुल शिंदे पंचायत समिती सदस्य डाॅ श्रीकांत पठारे पं.स.सदस्य दिनेश बाबर अशोक कटारिया अँड युवराज पाटील शंकर नगरे उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट तालुकाप्रमुख विकास रोहकले व युवासेनेचे तालुकाध्यक्ष नितीन शेळके शहरप्रमुख निलेश खोडदे विजय डोळ युवराज पठारे नगरसेवक मुदस्सर सय्यद नगरसेवक  किसन गंधाडे डाॅ राजेश भनगडे संतोष येवले आनंदा औटी साहेबराव देशमाने आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातील पैसे एकत्र करून हे कोविड केअर सेंटर  तयार केले आहे.  भविष्यात जर  समुह संसर्ग झाला तर  बाधित रुग्ण  कुठं  ऍडमिट करायचे हा प्रश्न निर्माण होईल मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका राजकीय पक्षाने स्वतःच्या हिमतीवर उघडलेलं हे पहिलं कोविड केअर सेंटर आहे. पारनेरच्या शिवसेनेने जो पायंडा पाडला आहे त्याचं अनुकरण राज्यात होईल.
------------
विजय औटी
 माजी उपाध्यक्ष विधानसभा

 सामाजिक गरज असताना शिवसेनेने हे कोविड केअर सेंटर तयार केले आहे पारनेर मधील शिवसैनिक सज्ज आहे. आणि तो शिवसैनिक कोविड सेंटरच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचलतोय हे कोविड सेंटर राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.
--------
भाऊ कोरगावकर 
शिवसेना संपर्कप्रमुख

 रक्तदानाला उस्फुर्त प्रतिसाद
शिवसेनेच्या वतीने पारनेर मध्ये विविध उपक्रम राबविले गेले यात रक्तदान शिबीर आयोजित केले त्यात युवकांनी चांगला प्रतिसाद दिला अनेक तरुण यासाठी पुढे आले शिवसेनेत आलेली मरगळ या निमित्ताने झटकली आहे यापुढेही असे सामजिक उपक्रम युवकांच्या माध्यमातून राबविले जातील.
----------
नीलेश खोडदे
शिवसेना शहरप्रमुख पारनेर