Breaking News

आमच्या कामाचे श्रेय आ. रोहित पवारांनी घेऊ नये : भाजपा

आमच्या कामाचे श्रेय आ. रोहित पवारांनी घेऊ नये : भाजपा
जामखेड प्रतिनिधी :
आमदार रोहित पवार यांनी आद्याप एकही काम मंजुर केलेले नाही मात्र माजी मंत्री राम शिंदे यांनी मंजूर करून भुमिपूजन केलेल्या कामांचे पुन्हा भुमिपूजन करत आहेत. दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्याचा  आमदार पवारांना नैतिक अधिकार नाही असे जामखेड भाजपाने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

  नुकतेच आमदार रोहित पवार यांनी २४ जुलै रोजी हळगाव -आघी रस्त्याचे भूमिपूजन केले. सदर रस्त्यासाठी माजी मंत्री  राम शिंदे यांनी रस्ता डांबरीकरणासाठी २ कोटी ४४लाख ६९ हजार इतका निधी  तसेच हळगाव ते ढवळे वस्ती रस्ता डांबरीकरणासाठी १ कोटी ८७ लाख रुपये मंजूर करून  त्याचे भूमिपूजनही १९ सप्टेंबर २०१९ रोजी केले होते. असे असताना आमदार रोहित पवार यांनी २४ जुलै रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करणे कितपत योग्य आहे दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय देऊन भूमिपूजन करण्याचा अधिकार त्यांना नाही असे भाजपच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.