Breaking News

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांवर हल्ला !

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांवर हल्ला.
देवळाली प्रवरा प्रतिनिधी :
                महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरामध्ये अत्यंत रहदारीच्या ठिकाणी रविवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल देसले यांच्यावर अचानक गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला. 

सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड व प्रतिकार केल्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायरमधून आलेल्या दोघांनी अचानक मागून येवून डॉ. देसले यांना बाजूला घेवून हल्ला चढविला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अत्यंत मनमिळावू व कोणाशीही शत्रुत्व नसलेल्या या प्राध्यापकावर झालेल्या हल्ल्यामुळे विद्यापीठाच्या अस्मितेवर पर्यायाने विद्यापीठातील सर्व कर्मचारी, प्राध्यापक यांच्या सन्मानावर हल्ला झाल्याचे आज विद्यापीठ वर्तुळात चित्र दिसून आले.