Breaking News

समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना ​'भारतरत्न' देण्याची मागणी;लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांची माहिती.!


समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना ​'भारतरत्न' देण्याची मागणी;लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांची माहिती.!

पाथर्डी/प्रतिनिधी :
           विश्व विख्यात साहित्यिक थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना सर्वोच्च पुरस्कार ​भारतरत्न हा पुरस्कार मिळवा याबाबत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महाराष्ट्रतील विविध आमदारांचे मंत्रीमंडळास देण्यासाठी शिफारस पत्र घेण्यात आले आहेत.त्याच अनुषंगाने आमदार मोनिका राजळे यांचे ही शिफारस पत्र घेतले असल्याबाबतची माहिती लहुजी शक्ती सेनेचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष सुभाष घोरपडे यांनी दिली आहे..  
               देशाचे राष्ट्रपुरुष,थोर समाजसेवक डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे समाजासाठी व देशातील दिन दलितांसाठी अद्वितीय असे योगदान आहे.तसेच ते मातंग समाजाचे प्रभावी समाजसुधारक होते.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे ते अग्रगण्य नायक असून त्यांनी दिन दलिताच्या व्यथा आपल्या लेखणीतून मांडल्या आहेत.व देशाला अनमोल साहित्याचा खजिना दिला आहे.१ ऑगस्ट रोजी समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधत  समाजसुधारक अण्णाभाऊ साठेना सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.