Breaking News

राळेगणसिद्धी येथील सहा जण कोरोना बाधित !

राळेगणसिद्धी येथील सहा जण कोरोना बाधित !
पारनेर तालुक्यात दिवसभरात कोरोना बाधितांची संख्या दहावर !
पारनेर प्रतिनिधी- 
     खासगी अहवाल प्राप्त झाला आहे त्यामध्ये राळेगणसिद्धी येथील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
     पारनेर तालुक्यात कोरोना बाधित यांची संख्या वाढत आहे आज दुपारी आलेल्या अहवालामध्ये म्हसोबा झाप येथील दोन जण दैठणे गुंजाळ व जवळा येथील प्रत्येकी एक जण असे चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये राळेगणसिद्धी येथील सहा जणांचे अहवाल खाजगी लॅब मधील प्राप्त झाले आहे ते पॉझिटिव्ह आले असल्याने तालुक्यात कोरोना बाधित संख्या वाढत आहे यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.