Breaking News

कोपरगावात पोलिसांचे संचलन !

कोपरगावात पोलिसांचे संचलन !
करंजी प्रतिनिधी-
 आगामी बकरी ईद व गणेशोत्सव काळात कोपरगाव  शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणून पोलिस दलाच्या वतीने शहरातून पोलिसांकडून पथ संचलन करण्यात आले.
    आगामी बकरी ईद व गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या साठी खबरदारी चा उपाय म्हणून शहरातील संवेदनशील असलेल्या गांधीनगर, संजय नगर, हनुमान नगर अशा भागात कायदा व सुव्यवस्था विषयी काही प्रश्न उपस्थित नको होयला त्यामुळे  खबरदारीचा उपाय म्हणून कोपरगाव पोलिसाच्या वतीने शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी हरी सोमनाथजी वाकचौरे साहेब यांच्या उपस्थितीत  कोपरगाव शहरातून पोलिसांचे पथ संचलन करण्यात आले.
   या संचलनात कोपरगाव शहर व तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येविषयी लोकांना कोरोना चे गांभीर्य कळावे अशी जनजागृती पोलिसा कडुन सोशल डिस्टनसिंग चे पालन करत करण्यात आली या पथ संचलनात कोपरगाव शहर चे पोलिस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर साहेब, कोपरगाव तालुका ग्रामिण चे पोलिस निरीक्षक श्री अनिल कटके साहेब, शिर्डी पोलिस इन्स्पेक्टर श्री गोकुळ औताडे,पोलिस उपनिरीक्षक श्री भरत नागरे साहेब यासह गृह रक्षक दलाचे कर्मचारी,माजी सैनिक,शिर्डी, कोपरगाव ग्रामीण व शहरी विभागाचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी श्री वाकचौरे यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास पोलिस प्रशासन सज्ज असून आपण सर्वांनी येणाऱ्या बकरी ईद या सणाच्या दिवशी मुस्लिम बांधवानी आपआपल्या घरातच नमाज पठण करत सण साजरा करावा व ऑगस्ट मध्ये येणार सार्वजनिक गणेशोत्सव देखील नियमांत साजरा करावा जेणेकरून कायदा व सुव्यवसस्थेचा प्रश्न उपस्थित होईल असे कृत्य करू नये.तसेच वाढत्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या लॉकडाउन च्या नियमांचे पालन करावे.