Breaking News

भारताचा दबाव यशस्वी, चीन सैन्याची माघारी!

लद्दाख सीमेवरून दीड किलोमीटर मागे हटले

- एलएसीवरील तंबू आणि लष्करी वाहनेदेखील हटविण्यास सुरुवात

लद्दाख/वृत्तसंस्था
पूर्व लद्दाखमधील भारताचे कडक धोरण आणि दिलेल्या दोरदार प्रत्युत्तरामुळे चीनच्या आक्रमक पवित्र्यात आता नरमाई दिसू लागली आहे. गलवान खोर्‍यात भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने भारतापुढे झुकत आपल्या सैनिकांना गलवान खोर्‍यातील हिंसक संघर्ष झालेल्या जागेतून दीड किलोमीटर मागे हटवले आहे. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान कमांडर स्तरावर अनेक बैठका झाल्या आहेत. तरीही तणाव निवळण्याचे नाव घेत नसल्याचे पाहून मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जबाबदारी देण्यात आली होती.
गलवान येथून चिनी सैनिकांच्या गाड्या मागे जात असल्याचे दिसत असून, पीएलए पीपी 14 येथून टेंट देखील काढण्याचे काम सुरु होते. चिनी सैन्य गलवान, हॉटस्परिंग आणि गोगरा सीमेवर मागे जाताना दिसत आहेत, असे लष्करी अधिकारी सूत्राने सांगितले. गलवान खोर्‍यातील तणाव निवळण्यासाठी चीनने उचललेले हे पहिले पाऊल असल्याचे जाणकार मानत आहेत. 15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला होता. यात भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. तर या संघर्षात चीनचे 40 जवान मारले गेल्याचे सांगण्यात येते. सोमवारी हाती आलेल्य वृत्तानुसार, पूर्व लद्दाख मधील गलवान खोर्‍यात चीनचे सैनिक डिसएन्गेजमेंट प्रक्रियेअंतर्गत दीड किलोमीटर मागे हटले आहेत. या बाबत लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी आपले कॅम्प देखील मागे हटवले आहेत. मात्र, याबाबत लष्कराकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत निवेदन आलेले नाही. लष्करी माहितीनुसार, चिनी सैन्याने दीड ते दोन किलोमीटरपर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत.  पेट्रोलिंग प्वाईंट 14 ही तिच जागा आहे जिथे 15-16 जून दरम्यान रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. चीनने हे तंबू तणाव निवळण्यासाठी केलेल्या चर्चेनंतर हटवले आहेत.