Breaking News

अकोले तालुक्यात आदिवासी भागात भात आवणीला सुरवात

राजूर/प्रतिनिधी :
      प्रति काश्मिर म्हणुन प्रसिद्ध असणा-या भंडारादरा धरणाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मौसमी पावसाचे दमदार आगमण झाले असुन भात लागवडीसाठी खोळंबलेल्या आदिवासी शेतक-यांनी भात आवणीला सुरुवात केले.
     अहमदनगर जिल्ह्यातील भंडारादरा म्हणजे पावसाचे माहेरघर समजले जाते. दरवर्षी सात जुन्या आसपास वरुण राजा डरकाळ्या फोडत भंडारादरा धरणाच्या पाणलोटात दिमाखात आगमन करत असतो. पंरतु यावर्षी मात्र जुलै उजाडला तरी पावसाचा थांगपत्ता नव्हता. आदिवासी शेतकरी बांधवांनी वळवाच्या पावसावर भाताची रोपे तयार करुन ती कशीबशी वाढविली होती. पावसाची लक्षणे दिसत नसल्याने ती रोपे जळुन जाण्याच्या स्थितीत असतानाच पावसाचे गत दोन दिवसापासुन जोरदार कोसळणे सुरु झाले आहे. भात खाचरांमध्ये तुडुंब पाणी भरणे सुरुवात झाल्याने आदिवासी शेतक-यांची या चेह-यावर हासु फुलले आहे. घाटघर, रतनवाडी , साम्रद, उडदावणे, पांजरे, चिचोंडी या ठिकाणी तसेच कळसुबाईच्या पायथ्याशी भात लागवड मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहे.डोंगररांगेने हिरवळरुपी शाल पांघरली असुन धबधब्यांची मालीकाच कड्याकपा-यावरुन फेसाळत वाहत आहे. या पावसानी वाकी तलाव ११२ द,श,ल,घ असलेला काल संध्याकाळी भरून वाहू लागला आहे,
     भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सर्व भागात पाऊस कोसळतच असुन नदी नाल्यांना आक्रमक रुप धारण केले असुन ते आक्राळ विक्राळ स्वरुपात ओसंडुन वाहत आहेत. त्यामुळे भंडारादरा धरणात नविन पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली. पावसाचे माहेरघर म्हणुन प्रसिद्ध असणा-या एकट्या घाटघर या ठिकाणी रविवारी १२५ मी मी ची नोंद झाली असुन भंडारदरा येथे ६५ मी मी पावसाची नोंद झाली आहे. तर तोच पाऊस रतनवाडी येथे १०९ मी मी, पांजरे ७५ मी मी तर वाकी येथे ४७ मी मी कोसळला आहे. भंडारदरा धरणामध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे गत चौविस तासात १९६ दलघफुट नविन पाण्याची आवक झाली असुन भंडारदरा धरणाचा एकुण पाणीसाठा ३०८४ दलघफु झाला आहे.