Breaking News

शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याप्रकरणी निषेध नोंदवण्यात आला !शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेवर आक्षेप घेतल्याप्रकरणी निषेध नोंदवण्यात आला
पाथर्डी/प्रतिनिधी :
                   भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतल्याप्रकरणी  शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देऊन या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला.   
                    त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे अख्या जगाचे दैवत असुन त्यांचे नाव घेऊन मतदान माघणारे भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरातात हे निदननिय असुन,यापुढे जर असे अपशब्द कोणी वापरले तर शिवसेना खपवून घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला.        
   यावेळी तालुका प्रमुख अंकुश चितळे,शहर प्रमुख सागर राठोड,अनिल फुंदे आदि जण उपस्थित होते.