Breaking News

पारनेर तालुक्यात दिवसभरात तीन कोरोना बाधित, सुपा येथील पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात दिवसभरात तीन कोरोना बाधित, सुपा येथील पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह !
--------
हंगे येथील जावया पाठोपाठ डोंगरवाडी येथील ७३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा 
--–    
पारनेर न्यायालयातील एक कर्मचारी बाधित आढळला होता त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत
पारनेर प्रतिनिधी-
   पारनेर तालुक्यातील सुपा येथील पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह व डोंगरवाडी येथील एका 73 वर्षीय व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे त्याच्या  चाचणी अहवालावरून निष्पन्न झाले आहे. तसेच पारनेर न्यायालयातील एक कर्मचारी बाधित आढळला होता त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
तालुक्यात दि.28 जुलै रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालानुसार तीन व्यक्तीला कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे ही व्यक्ती स्थानिकच आहेत. तर हंगा येथील मृत महिलेचा जावई रॅपिड किटच्या टेस्टमध्ये पॉझिटिव आला आहे.
बाधित व्यक्ती आढळली आहे तो 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.