Breaking News

स्नेहल हारदे हिची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तिचा आ.लंके यांच्या हस्ते सत्कार !

स्नेहल हारदे हिची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तिचा आ.लंके यांच्या हस्ते सत्कार !
पारनेर/प्रतिनिधी - 
सन 2017 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा झाली होती नुकताच त्याचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील स्नेहल राजेंद्र हारदे हिची निवड झाली या निवडीबाबत पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी तिचा सत्कार केला
वडनेर हवेली येथील कै राजेंद्र हारदे (सर) त्यांची ती मुलगी आहे ते पुणेवाडी येथे माध्यमिक विद्यालया मध्ये शिक्षक होते तिला सहाय्यक निरीक्षक होण्यामागे त्यांचे योगदान महत्वाचे राहिले होते.
स्नेहल हारदे ही पारनेर येथील जिल्हा परिषद शाळा मुली येथे पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर पुढील शिक्षण इंग्लिश स्कूल पारनेर येथे झाले होते त्यानंतर तिने पुणे येथे यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यानंतर तिने स्पर्धापरीक्षाचा अभ्यास केला तिने यापूर्वी या परीक्षेसाठी नियोजन केले होते व त्यामुळेच तिला या परीक्षेमध्ये यश मिळाले याबद्दल आ.निलेश लंके यांनी तिचे कौतुक केले व यापुढे चांगली समाजाची सेवा कर असा सल्ला दिला स्नेहल हारदे हिच्या प्रमाणे तालुक्यातील विद्यार्थ्यांकडे अभ्यासाची चिकाटी समोर ठेवलेले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जिद्द असेल तर ते आपले ध्येय साध्य करू शकतात असे आ.लंके म्हणाले.
यावेळी तिची आई निलिमा राजेंद्र हारदे,रामराव रेपाळे, रावसाहेब रेपाळे, आबा रेपाळे,भाऊसाहेब भालेकर  सतीश भालेकर, बबन दरेकर, साहेबराव वाळुंज,उत्तम भालेकर, शशिकांत भालेकर, अरुण बढे, संकेत हारदे, भाऊ हारदे, दीपक भालेकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.