Breaking News

बुलडाणा हादरले; तीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार

बुलडाणा हादरले; तीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार
- फाशी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न
बुलडाणा/प्रतिनिधी :
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी लैंगिक करण्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील २४ वर्षीय नराधमाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसाच्या हवाली केले.
स्टेशन रोड परिसरात राहणारी तीन वर्षीय चिमुरडी अंगणात खेळत होती. तेव्हा नैनेश लक्ष्मणदास रामचंदानी (वय २४ राहणार नांदुरा) याने सदर मुलीला कडेवर उचलून नेऊन पंचायत समिती आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागील ओसाड व झाडाझुडपांनी गजबजलेल्या निवांत जागी नेऊन तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पंचायत समितीमधील एका कर्मचार्‍याला मुलीच्या रडण्याचा आवाज आला त्याने दवाखान्यातील कर्मचार्‍यांसह आवाजाच्या दिशेने घटनास्थळ गाठले तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता. यावेळी मुलीच्या गळ्याला तिच्यात अंगातील कपड्यांनी गळफास देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यावेळी काही तरुणांनी त्या नराधमाचा शोध घेऊन त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर या नराधमाला पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर बालिकेला नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. रामचंदानी या नराधमावर अ‍ॅट्रोसिटी कायदा, खुनाचा प्रयत्न करणे आणि पोक्सो कायद्यानुसार नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---------------------------