Breaking News

आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना फसवलं ?

अहमदनगर/प्रतिनिधी :
     पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, दिल्या नंतर समजलं ते शिवसेनेचे अजित पवार यांनी केले वक्तव्य, पवार म्हणाले की "मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना सांगत होतो, काळजी घ्या. तेव्हा काही वाहनं आली. तिथे आमदार निलेश लंके आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे, तर ते मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात गमछे टाकले. कार्यक्रम झाला आणि मग मला कळलं की, ते शिवसेनेचे होते.” असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नगरसेवक प्रवेशा संदर्भात पूर्ण माहिती न देता पारनेर चे आमदार निलेश लंके यांनी पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेऊन शिवसेनेच्या नागरसेवकांना आपल्या कडे खेचले होते का ? यामधून त्यांना काय सिद्ध करायचे होते.
     आशा पध्दतीने आमदार निलेश लंके यांनी राजकारण केल्यामुळे हा विषय राज्यपातळीवर चर्चेचा ठरला  होता. आणि महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.