Breaking News

काळेवाडी चेकपोस्टला गोमास वाहतूक करणारा टेम्पो पकडला !

 काळेवाडी चेकपोस्टला  गोमास वाहतूक करणारा टेम्पो पकडला !
699000 रुपयाचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटक ! पारनेर पोलिसांची धडक कार्यवाही !
पारनेर/ प्रतिनिधी -
 तालुक्यातील काळेवाडी चेक पोस्ट येथे गोमास वाहतूक करताना आयशर टेम्पो पारनेर पोलिसांनी पकडला असून चालकासह एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 20 रोजी 12.30 वा. च्या सुमारास पारनेर पोलीस ठाणे हद्दीत काळेवाडी चेक पोस्ट येथे वाहनाची ई पास व बकरी ईद चे अनुशंगाने पोलिस उप निरीक्षक  बोकिल आणि इतर पोलिस कर्मचारी यांना तपासणी करत आसताना  एक लाल रंगाचा आयशर प्रो. 1095 XP क्रमांक MH-04-JU-3725 हा चेक गोवंश मांस वाहतूक करतांना मिळून आला. असून सदरचा  एकूण 6,99000 रु मुद्देमाल आणि आरोपी चालक अनिल भाऊसाहेब मंडलिक. क्लिनर.गौतम दामोधर झालटे दोघे रा संगमनेर अ.नगर, सह पो स्टे ला आणून त्यांचे विरूद्ध पारनेर पो स्टे  गु  गुन्हा दाखल केला आहे
 कारवाई ही मा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे