Breaking News

धनगर समाज्याच्या वतीने तहसीलदार कोपरगाव यांना निवेदन !

धनगर समाज्याच्या वतीने तहसीलदार कोपरगाव यांना निवेदन 
करंजी प्रतिनिधी-
 मेंढपाळावरील वाढत्या अत्याचार, हल्ले व नैसर्गिक अपत्तीवर तात्काळ प्रतिबंद घालण्यासाठी 'विशेष कायद्याची' तरतुद करणे व 'गावगुंड व जंगली स्वापदापासून'  स्व:रक्षणार्थ "बंदूक शस्त्र" परवाने  अशा आशयाचे निवेदन शासनाला कोपरगाव चे तहसीलदार श्री योगेश चंद्रे यांना धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले आहे       या निवेदनात महाराष्ट्र व इतर राज्यातील मेंढपाळावरील गावगुंडाकडून अन्याय, अत्याचार व हल्ल्यांचे प्रकार दिवसागणिक वाढत असून मेंढपाळांचे जीवन जगणं दुरापास्त झालेले आहे.मागील दिवसापासून काही अमानुष घटना वाढत आहे  या गावगुंडाच्या वाढत्या अन्याय, अत्याचार, हल्ले व नैसर्गिक अपत्तींवर प्रतिबंध घालण्यासाठी मोक्का, मिसा, पोटा अश्या  विशेष कायद्याची तरतुद करावी, जनावरांना चराईसाठी वने आरक्षित करावी, भटक्या मेंढपाळांवरी वरील गंभीर गुन्हांची नोंद घेऊन गावगुंड व जंगली स्वापदापासून स्व: रक्षणार्थ बंदूक शस्त्र परवाने मिळावे, मेंढपाळावरील खोटे गुन्हे मागे घ्यावीत, हल्यात मृत्यू मुखी पडलेल्या घटनेतील आरोपीवर मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करावी, मेंढपाळांना बंदिस्त शेळी मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहान देण्यासाठी जमीनीसह  कायमस्वरूपी किमान २५ लाखा पर्यन्त  भरीव आर्थिक अनुदान व्यवस्था करावी वरील मागण्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर श्री सोमनाथ हिरे, श्री किरण फटांगरे श्री जालिंदर दहाडदे श्री सागर नेहे श्री संतोष हिरे श्री अंकुश फटांगरे आदींच्या सह्या आहेत.