Breaking News

चोर तर चोर वर शिरजोर.... नेवासा फाटा येथील भाजीपाला विक्रेत्यांची दादागिरी.

चोर तर चोर वर शिरजोर.... नेवासा फाटा येथील भाजीपाला विक्रेत्यांची दादागिरी.

नेवासा तालुका प्रतिनिधी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये म्हणून प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी आठवडे बाजार बंद करण्यात आलेले आहेत.त्यामुळे जिवनावश्यक सेवा म्हणून स्थानिक भाजी विक्रिते चढ्या भावाने भाजीपाला विक्री करत आहेत. तर शेतकरी थेट दुचाकींवर येवून दारोदार भाजीपाला स्वस्त दरात विक्री करत आसल्याने स्थानिक दुकाण लावून बसलेले भाजीपाला विक्रते थेट फिरीवाल्या शेतकऱ्यांना ही आमची गल्ली आहे येथे पुन्हा भाजी घेवून आलात तर याद राखा असा धमकीचा डोस भरुन आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत.त्यामुळे स्वस्त दरात मिळणाऱ्या भाजीपाल्याला नेवासा फाटा येथील नागरीक मुकले आसून स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
  कोरोनाच्या संकटात गोरगरीबांच्या हाताला काम नाही.अर्थिक संकटाचा सामना वेळोवेळी करावा लागत आसतांना स्थानिक भाजीपाला विक्रिते चढ्या भावाने भाजीपाला विक्री करत आहेत. तर शेतकरी थेट ग्राहकांना घरपोहच भाजीपाला स्वस्त दरात विक्री करत आसल्याने स्थानिक भाजीपाला विक्रितेंचा भाजीपाला कोणी घेत नसल्याने आता स्थानिक भाजीपाला विक्रते थेट शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या गाड्या अडवून हा आमचा परिसर असल्याचे सांगून त्यांना गल्लीबोळात फिरु देत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.नेवासा फाटा परिसरात या वाढत्या तक्रारी येत आसून पोलिसांनी स्थानिक भाजीपाल्या विक्रित्यांच्या मुसक्या आवळून त्यांना धडा शिकविण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

स्थानिक भाजीपाला विक्रत्यांनी शेतकरी फेरीवाल्यांना दम दिला किंवा फिरु दिले नाही तर त्यांच्या नावानिशी तक्रारी पोलिस ठाण्यात कराव्यात त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे नेवासा पोलिस ठाण्याच्यावतीने कळविण्यात आलेले असून अशा भाजीपाल्या विक्रित्यांनी नेवासा पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस कॉस्टेबल संभाजी गर्जे यांनी केले आहे.