Breaking News

तहसील कार्यालयावर दूध दरवाढीच्या मागणीसाठी रासपचे पांडुरंगाला दुग्धाभिषेक करून आंदोलन.

दुधाला किमान ३५ रूपये भाव  देण्याची मागणी 
  श्रीरामपूर/प्रतिनिधी : 
एकिकडे राज्यात कृषी सप्ताह दिन साजरा होत असतानाच दुसर्‍याकडे शेतकर्‍यांना दुध दरवाढीसाठी आंदोलन करावा लागत असून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राज्यात दुग्ध दरवाढीच्या मागणीसाठी सर्वच तलसील कार्यालयावर आंदोलन केले जात आहे शेतकर्‍यांच्या दुधाला किमान ३५ रूपये दराने भाव मिळावा.या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रीरामपूर तालुक्याच्या कार्यकर्त्यानी दुध दरवाढीच्या मागणीसाठी श्रीरामपूर तलसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
    श्रीरामपूर तलसील कार्यालयाच्या समोर पांडुरंगाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून शेतकर्‍यांच्या दुधाला किमान ३५ दराप्रमाणे भाव मिळावा या मागणीसाठी रासपच्या वतीने आंदोलन करण्यात आले या तिघाडी सरकारने शेतकर्‍यांच्या प्रति लिटर दुधाला १० रू अनुदान स्वरुपात देऊन या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
          मुख्यमंत्री महोदयांना हे पांडुरंगा तू त्यांना सद्दबुध्दी दे रे बाबा! असे साकडे पांडूरंग चरणी घालण्यात आलं.यावेळी कोरोना संदर्भातील सर्वच कायदेशीर नियमाचे पालन करत आंदोलन करण्यात आले तरी आपल्या स्तरावर शेतकऱ्याचे दुध दराबाबतच सरकारने लक्ष घालून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली 
या मागणीचे निवेदन श्रीरामपूर नायब तहसीलदार गुजांळ मॅडम यांनी शेतकर्‍यांचे निवेदन स्विकारले यावेळी रासपचे जिल्हा सचिव डॉ सुनिल चिंधे रासपचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कचरे मनोज देवकाते उक्कलगावचे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक बापूसाहेब चिंधे सतिश देठे गणेश हाळनोर बाळासाहेब माकोणे अक्षय चक्रनारायण मंजाबापू खेमनर आदि गावचे रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते.