Breaking News

माझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील असे म्हणत महिलेचा केला विनयभंग !

माझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील असे म्हणत महिलेचा केला विनयभंग
पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील सुतार वाडी येथील एका 40 वर्षीय महिलेचा एकाने विनयभंग करून तिच्या पतीला शिवीगाळ करून घरासमोरील गाडीची दगड मारून काच फोडली तसेच तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील अशी धमकी दिली याबाबत महिलेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सुतारवाडी या ठिकाणी दि 26 रोजी फिर्यादी महिला ही त्यांचे पळस नावाचे शेतात एकटीच शेळ्या चारीत असताना यातील आरोपी प्रकाश सुखदेव सांगळे राहणार सुतारवाडी ढवळपुरी तालुका पारनेर याने पाठीमागून येऊन महिलेचा उजवा हात धरुन तू मला आवडतेस तू जर माझ्याकडे संध्याकाळी आली नाही तर मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन असे म्हणून महिलेस मिठी मारली त्यावेळी महिलेने मोठ्याने आरडा - ओरडा केल्याने आरोपी निघून गेला.घडलेल्या प्रकाराबाबत महिलेच्या पतीने आरोपी ला याबत विचारण्यास गेले असता आरोपी याने तू मला काय विचारतोस तुझ्या बायकोलाच विचार असे म्हणून महिलेच्या पतीस शिवीगाळ करून महिलेच्या घरासमोर लावलेल्या छोटा हत्ती गाडीची समोरील काचेवर दगड मारून काच फोडून गाडीचे काचेचे नुकसान करून तेथून निघून गेला आहे याबाबत महिलेने पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.